मुंबई : महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 8 नंतर राज्य सरकारने कडक बंद जाहीर केल्याने झोमॅटो आणि स्विगीने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नाईट कर्फ्यू (Night Curfew) जाहीर केला आहे. ज्यामुळे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही विनाकारण बाहेर पडता येणार नाहीये. हे नवीन आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

swiggy आणि zomato ने देखील यानंतर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो आणि स्विगी दोघेही रात्री 8 नंतर ऑर्डर स्विकारत नाहीयेत. मुंबईत रात्री 8 नंतर अॅप-मध्ये ऑर्डर घेतली जात नाहीये. त्यामुळे रात्री 8 नंतर ऑर्डर करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला उपाशी राहावं लागू शकतं. (No food order in Night curfew)


नव्या निर्बंधानुसार हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार फक्त पार्सल सुविधा मिळणार आहे. हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाहीये.


महाराष्ट्र सरकारने सांगितले की अत्यावश्यक सेवांची दुकाने, वैद्यकीय दुकाने आणि किराणा दुकान वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठ आणि शॉपिंग मॉल्स 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.


संबंधित बातमी : Curfew : रात्री 8 नंतर बाहेर पडायचे असेल तर या गोष्टी जवळ असणं आवश्यक