मुंबई : सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोनं खरेदीवर तीन टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं जीएसटीचा भार ग्राहकांवर पडणार आहे.


आजवर ग्राहकांना केवळ एक टक्के जकात कर भरावा लागत होता. तर अबकारी कर आणि व्हॅट व्यापारी देत होते. आता जीएसटी लागू झाल्यावर जकात, अबकारी करत आणि व्हॅट याचा भार ग्राहकांवरच पडणार असून त्यांना सोन्यावर तीन टक्के कर द्यावा लागणार आहे.