मोठी बातमी । स्पाईस जेटवर सायबर हल्ला, रॅन्समवेअरच्या हल्ल्यामुळे उड्डाणांचा खोळंबा
Cyber attack on a SpiceJet : स्पाईस जेटवर सायबर हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई : Cyber attack on a SpiceJet : स्पाईस जेटवर सायबर हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (SpiceJet suffers attempt of ransomware attack. Flights normal after some delays) रॅन्समवेअरच्या हल्ल्यामुळे (ransomware attack) सकाळी उड्डाणांचा खोळंबा झाला. दरम्यान, स्पाईस जेटच्या आयटी टीमकडून तत्काळ सिस्टीम नियंत्रणात आणली गेली. आता स्पाईस जेटची उड्डाणे सामान्यपणे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्पाईसजेटवर रॅन्समवेअर हल्ल्याचा प्रयत्न झाला. काही विलंबानंतर विमान उड्डाणे पूर्ववर सुरु झाली आहेत. स्पाईसजेट विमान कंपनीने आज सकाळी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे त्यांचे कामकाज थांबले होते आणि सकाळी उड्डाणाच्या सुटण्यावर परिणाम झाला.
25 मे रोजी स्पाईसजेटने काल रात्री रॅन्समवेअर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. ज्यामुळे सेवा ठप्प झाली होती. यामुळे सकाळच्या विमान निर्गमनांवर परिणाम झाला. काही स्पाईसजेट सिस्टीमला काल रात्री रॅन्समवेअर हल्ल्याचा सामना करावा लागला. ज्यामुळे आज सकाळळी विमाना सेवेवर याचा परिणाम झाला. आमच्या IT टीमने परिस्थिती नियंत्रित केली आणि सुधारली आणि आता उड्डाणे सामान्यपणे सुरु आहेत, असे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.
अनेक लोकांनी सांगितले की, ते विमानतळावर थांबले होते किंवा एअरलाइनकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने विमानात अडकले होते . स्पाईसजेट प्रवाशी तासनतास अडकून पडले होते. स्पाईसजेटने फ्लाइट्सच्या विलंबाबाबत कोणतीही अपडेट कळवली नसल्याचा दावा करत प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी ट्विटरवर मांडल्या.