Cyrus Mistry Accident: टाटा समूहाचे माजी चेअरमन (Chairman) सायरस मिस्त्री (Cyrus Mistri) यांचं रविवारी अपघाती निधन झालं. मुंबईनजीक असणाऱ्या पालघर येथे असणाऱ्या सूर्या नदीच्या पुलावर असणाऱ्या डिवायडरला त्यांच्या कारनं धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. (Cyrus Mistry Car Crash Death driver anahita pandole know details )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार मिस्त्री अहमदाबाद येथून मुंबई (Ahamadabad to Mumbai) दिशेनं प्रवास करत होते आणि त्यांची मर्सिडीज कार मुंबईच्या प्रख्यात स्त्रीरोग विशेषज्ञ अनाहिता पंडोले (55) चालवत होत्या. अनाहिता यांचे पती, डेरियस पंडोले (60)सुद्धा या अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. 


कोण आहेत अनाहिता पंडोले? 


- जानेवारी 2004 मध्ये बॉम्बे पारसी पंचायतीच्या जोडीनं पंडोले यांनी 'द बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट'ती सुरुवात केली होती. पारसी समुदायाच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय घट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. 


- जियो पारसी स्कीमची संकप्लनाही याच प्रकल्पामुळं सुचली होती. 


Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या गाडीची अपघातानंतर अशी झाली अवस्था, फोटो आले समोर


 


(Accident) अपघातानंतर काय घडलं? 
अतिशय भीषण स्वरुपातील या अपघातामध्ये (Cyrus Mistry Car Crash) सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी कार अनाहिता चालवत होत्या. प्रचंड वेग आणि कार चालवत असताना योग्य वळी योग्य निर्णय न घेतला गेल्यामुळं हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये दोन व्यक्तींनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. 


चरोटी चौकीजवळून कार दुपारी 2.21 वाजता सुस्साट गेली आणि पुढे  20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अवघ्या नऊ मिनिटांत कार 20 किमी अंतर कापून होती. त्यावरून कार भरधाव वेगात असल्याचं स्पष्ट होत आहे.