मुंबई : भारतातील उद्योजक आणि शापूरजी पालोनजी ग्रुपचे वंशज सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा महाराष्ट्रातील पालघर येथे कार अपघातात मृत्यू झाला होता. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष राहिलेल्या सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अपघातादरम्यान गाडी चालवणाऱ्या अनाहिता पांडोले यांच्या विरोधात कलम 304 (A), 279, 336, 338 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज डॉक्टर अनाहिता पांडोले (Dr Anahita Pandole) चालवत होत्या.  याप्रकरणी पोलिसांनी अनाहिताचा पती डेरियस पांडोले याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कार अपघातातून वाचलेल्या Darius Pandole यांना गेल्या महिन्याच्या अखेरीस मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


लेन बदलता न आल्याने गाडी नदीच्या पुलावरील रेलिंगला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे मोठे नुकसान झाले. मर्सिडीज कारमधील सर्व एअर बॅग उघडल्या. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोले यांचा मृत्यू झाला. तर कार चालवणारी महिला डॉ. अनाहिता पांडोले आणि पुढच्या सीटवर बसलेले पती डेरियस पांडोले हे दोघे गंभीर जखमी झाले होते.


डेरियस पांडोले यांनी पालघरमधील कासा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सांगितले की, अपघात झालेल्या सूर्या नदीच्या पुलाजवळ त्याची पत्नी अनाहिता पांडोले तिसऱ्या लेनमध्ये कार चालवत होत्या. तिथे रस्ता अरुंद असल्याने त्यांची पत्नी लेन बदलू शकली नाही.


डेरियस पांडोले यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोले कार चालवत होत्या. ते तिच्यासोबत पुढच्या सीटवर बसले होते. सायरस मिस्त्री आणि त्यांचा भाऊ जहांगीर पांडोले मागच्या सीटवर बसले होते. मर्सिडीज बेंझ कारमधून ते गुजरातहून महाराष्ट्रात (Mumbai-Ahmedabad national highway) परतत होते.