मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना (Shivsena) वादात आता भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतलीय. राणेंनी सदा सरवणकरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मुंबईतल्या प्रभादेवीत सरवणकर-शिवसैनिकांमध्ये (Sada Sarvankar vs Shisena) राडा झाला होता. सरवणकर आणि मुख्यमंत्री शिंदेंचं (CM Eknath Shinde) पोस्टर फाडण्यात आलं होतं. सरवणकरांनी गोळी झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता याच सगळ्या राडेबाजीनंतर नारायण राणे यांनी सरवणकरांची भेट घेतली. सरवणकरांच्या घरी जाऊन राणे भेटले तेव्हा स्वत: सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) हे नारायण राणेंच्या स्वागतासाठी घराखाली उभे होते. यावेळी राणेंनी आपल्या स्टाईलमध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) इशारा दिला.


मातोश्रीच्या (Matoshree) दुकानात बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल असा इशाराच नारायण राणे यांनी दिला.


आता राणेंच्या इशाराऱ्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झालाय. केंद्रातील मंत्री नारायण राणे दादागिरी करत धमकी देत आहेत, असं गुंडांचं सरकार बरखास्त करावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलीय.


राणे-सरवणकर भेटीला का महत्त्व?
सदा सरवणकर हे 2009 मध्ये शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये (Congress) गेले होते. दोघेही एकेकाळचे सहकारी होते. दोघांचं मूळ कोकणच आहे. पण काही काळानंतर सरवणकर शिवसेनेत परतले. त्यावेळी सरवणकर-राणे यांच्यात दुरावा आला आणि दोघेही एकमेकांचे राजकीय हाडवैरी बनले. दादर परिसरात नितेश राणेंनी भाजप कार्यालय उघडण्यावरुन सरवणकरांनी इशारा दिला होता. 


त्यानंतर सरवणकर-राणे तणावही निर्माण झाला होता. पण आता राणे-सरवणकर राजकीयदृष्ट्या एकाच बाजूला आहेत. उद्धव ठाकरे हेच राणे आणि सरवणकरांचे राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरुन राणे सरवणकरांना भेटायला गेलेत. राणेंची एन्ट्री सरवणकरांना नक्कीच बळ देणारी ठरणार आहे.