Dadar Shivsena Bhavan Car Fire: दादरमधील सेनाभवनासमोरील रस्त्यावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संपूर्ण कार आगीच्या भष्यस्थानी पडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला आग लागल्याने काही काळ येथील वाहतूक थांबवण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारला आग लागली ती एक खासगी टॅक्सी होती. सेना भवनाच्या बाहेर या गाडीला आग लागल्याने वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली. कोहिनूर स्वेअरमधून पाण्याचा पाईप टाकू आग विझवण्याचा प्रयत्न काही मिनिटांनंतर सुरक्षारक्षकांनी केला. दरम्यानच्या काळात आजूबाजूची दुकानं बंद करण्यात आली. स्थानिकांबरोबरच शिवसेना भवनामधील सुरक्षारक्षकांनीही गाडीची आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नांना काही वेळाने यश आलं. अग्निश्मनदल गाडीची आग स्थानिकांनी विझवेपर्यंत पोहचलेलं नव्हतं.


समोर आलेल्या माहितीनुसार ही वॅगनआर गाडी होती. ही गाडी शिवसेना भवनासमोर पार्क करण्यात आली होती. या गाडीमध्ये सुदैवाने कोणीही नव्हतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. दुपारच्या सुमारास सेनाभवनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. ही बैठक सुरु असतानाच ही आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली.


आग विझवण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून कुलिंग ऑप्रेशन सुरु करण्यात आलं आहे. गाडीमध्ये इतर काही ज्वलनशील पदार्थ नाहीत ना, या गाडीला पुन्हा आग लागण्याची शक्यता नाही ना यासंदर्भातील चाचपणी अग्निशमन दलाने केली. शिवसेना भवन ही मुंबईमधील महत्त्वाच्या इमारतींपैकी एक असल्याने या घटनेचा पोलिसांकडूनही तपास केला जाणार असल्याचे समजते. 


जळून खाक झालेली वॅगनआर गाडी नेमकी कोणाच्या मालकीची आहे, तिला आग कशी लागली यासारख्या गोष्टींचा तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचं समजतं. यामागे काही घातपाताचा प्रकार आहे का यासंदर्भातील तपासही केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.