मुंबई : कुर्ला येथे पोलिसांवर जमवाने हल्ला केला. काही दिवसांपूर्वी एका मुलीचे अपहरण झाले होते. मुलीच्या पित्याने अपहरण झाले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, तक्रार करूनही मुलगी सापडली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कंटाळून  आत्महत्या केली. पांचाराम रिठाडीया यांनी रेल्वेरुळाखाली आपले जीवन संपवले. त्यांच्या अंतयात्रेदरम्यान जमलेल्या नागरिकांनी पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. त्यातील काहींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आणि परिस्थिीत हाताबाहेर गेल्याने अखेर पोलिसांनी लाठीमार केला. सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका दुर्दैवी बापाच्या अंत्ययात्रेत संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना कुर्ल्यात घडली. जमावाच्या मारहाणीत ५ पोलीस जखमी झालेत. पंचाराम रिठाडिया यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र तक्रार देऊनही मुलगी सापडली नाहीच. उलट पोलीसच मुलीच्या वडिलांना धमक्या देत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर नैराश्यातून पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वेरुळांवर आत्महत्या केली. 


त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येनं गोळा झालेल्या जमावानं यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून मुलीचा शोध वेळीच घेतला असता तर ही वेळ आली नसती, अशी खंत रिठाडिया कुटुंबानं व्यक्त केली आहे.