मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दाऊद पाकिस्तानमध्येच लपून बसल्याचं रिजवाननं सांगितलं आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी दाऊदचे चांगले संबंध असल्याचा खुलासाही रिझवाननं केला आहे. दाऊदला पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि खासगी कमांडो एकत्रितपणे सुरक्षा पुरवत असल्याची माहितीही त्यानं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख दाऊदच्या संपर्कात आहेत. अशी माहितीदेखील रिझवानने चौकशीदरम्यान दिली आहे. एका खंडणी प्रकरणात दाऊदचा पुतण्या रिझवानला मुंबई गुन्हे शाखेनं नुकतीच अटक केली होती.


देश सोडण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. रिझवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आणखी काय-काय माहिती समोर येते हे महत्त्वाचं ठरणार आहे.