मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी MPSC च्या रिक्त पदांबाबत महत्वाची माहिती दिली. MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर रिक्त पदांच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 


अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी यावेळी राज्यात किती रिक्त पद आहेत?  तसेच किती नियुक्त्या रखडल्या आहेत याची माहिती घेतली जाईल. त्याचप्रमाणे प्रलंबित परीक्षांचे निकाल तातडीने लावले जातील. तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. २०१८ पासून प्रलंबित असलेली 15501  पदे MPSC मार्फत भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच यात गट अ ४४१७, गट ब ८०२१, गट क ३०६३ पदे आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. 


विधानसभेत स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद 


स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करतंय… असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.


महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षा 2019 मध्ये जाहीर झाला होता. त्या परीक्षेत सुमारे 3600 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात काम करणाऱ्या समितीवर 2 सदस्य असल्यानं जोपर्यंत नव्या सदस्यांची नियुक्ती होणार नाही तोपर्यंत लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रिया गतिमान होणार नाही.