मुंबई : काही महिन्यांसाठी विश्रांती घेतल्यानंतर कोळी बांधवांची नाव ही समुद्राच्या दिशेनं निघाली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा हे मासेमार नव्या जोमानं आपल्या व्यवसायात रमले. दिवसागणिक आणि निसर्गाच्या मर्जीवर चालणाऱ्या या उद्योगामध्ये कोळी बांधवांना अनेकदा काही अनपेक्षित प्रसंगांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना कुलाबा बंदरात घडल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी, कुलाबा बंदर येथील ससून डॉकमध्ये मासेमारी करणाऱ्या एका बोटीला देवमासा सापडला. व्हेल शार्क या प्रजातीतील हा देवमासा मृतावस्थेत सापडल्यामुळं त्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान, सदर प्रकरणी राज्याचीत मत्स्य विभाग आणि राज्यातील  Mangrove cell यांच्याकडून सदर प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. 


व्हेल शार्क किंवा Rhincodon typus ही एक अवाढव्य प्रजाती आहे. पण, या प्रजातीच्या अधिवासाला काही वर्षांपासून धोका निर्माण झाल्यांचं आढळून आलं आहेभारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातही या प्रजातीचे अवाढव्य मासे पाहिले गेले आहेत. 



भारतामध्ये Wildlife (Protection) Act of India, 1972 च्या Schedule I  अंतर्गत व्हेल शार्क माशांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रजातीतील माशांना पकडून त्यांना मारणं कायदेशीर गुन्हा आहे.