मुंबई : मुंबईतल्या वरळी समुद्रकिनारी कोस्टल रोडच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बबलू कुमार पासवान असे या मयत मुलाचे नाव आहे. बबलू कुमार पासवा महात्मा फुले नगर भागात राहत होता. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही दुर्घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोड कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगावमध्ये उघड्या नाल्यात पडून दिव्यांश हा चिमुकला बेपत्ता झाल्याची घटना घडली. चार दिवस होऊनही दिव्यांश अद्याप बेपत्ता आहे. महापालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे अशा घटना घडत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.