मुंबई : तुम्ही गरबा (Garba) खेळायला जाताय तर जरा जपून. कारण मुंबईच्या मुलुंडमध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. मुंबईत भाजन नेते मनोज कोटक यांच्या गरब्यात हा तरुण सहभागी झाला होता. ऋषभ मंगे असं या तरुणाचं नाव आहे. (death of young boy while playing garba)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ एका खासगी कंपनीत कामाला होता. गरबा खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे मुलुंडच्याच आदिती हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं. पण डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मयत घोषित केलं.


ऋषभ आपल्या आईवडिलांसोबत डोंबिवली वेस्टला राहत होता. घरातला एकटा कमवणारा व्यक्ती होता. पण काळानं घाला घातल्यानं त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. ऋषभच्या मृत्यूमुळे तरुण व्यक्तींना येणारा हार्ट ऍटॅकचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.