मुंबई : धारावीमध्ये आढळेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये आढळलेला हा पहिला कोरोनाबाधित रुग्ण होता. 56 वर्षीय व्यक्तीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारीच या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या कुटुंबातील 8 ते 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ज्या इमारतीत हा रूग्ण राहत आहेत त्या इमारतीला सील करण्यात आलं आहे. धारावीतील मृत्यूनंतर मुंबईत कोरोना बळींचा आकडा 13वर पोहचला आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्येही कोरोनाने एन्ट्री केली आहे. धारावीमध्ये जवळपास १५ लाख लोकं राहतात. धारावी ६१३ हेक्टर क्षेत्रावर पसरलं आहे. धारावीमध्ये लाखो मजुरी करणारे आणि छोटे व्यापारी राहतात. त्यामुळे अशा वस्तीमध्ये कोरोनाचा शिरवाक मोठा धोका ठरु शकतो. 


 राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335वर पोहचला आहे. त्यापैकी 41 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत राज्यात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.