Prime Minister Narendra Modi Death Threat : आताची मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) नंबरवर 7 ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम (Underworld Dawood Ibrahim) याचे हस्तक मोदींवर हल्ला करणार असल्याचा धमकी देणाऱ्याने दावा केला आहे.


धमकी देणाऱ्यांची ओळख पटली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्तफा अहमद आणि नवाज अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीने नाव सांगितले आहे. तपासात धमकी देणाऱ्याची ओळख पटली असून तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. ऑडिओ क्लिपसोबत इतरही काही कागदपत्र पाठवले होते. त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. धमकी देणारा हा बिस्मा डायमंड कंपनीत दोन वर्षापूर्वी कामाला होता. त्याला कामावरुन कमी केल्याची माहिती आहे. (अधिक वाचा - खलिस्तानी दहशतवाद्याला अटक; दिल्ली विमानतळावर NIA कडून कारवाई)


माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आणि...


अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हे सांगणारा एक ऑडिओ मेसेज आलेला आहे. त्यानंतर आता पोलीस सतर्क झाले असून त्यांनी चौकशी सुरु केली. मात्र, धमकी देणारा मनोरुग्ण असल्याचे तपास पुढे आले आहे.  


ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ऑडिओ क्लिप ज्या मोबाईल क्रमांकावरुन आली, तो नंबर कोणाचा आहे, कुठून चालू आहे, याचा शोध घेतला. त्यातून धक्कादायक समोर आले. हा नंबर एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा आहे. ती व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे पुढे आले आहे. 



मुंबई वाहतूक विभागाला सलग दोन दिवस असा धमकीवजा ऑडिओ मेसेज आला होता. एका ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदच्या दोन हस्तकांची नावे घेतली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली. चौकशीत जास्त काहीही माहिती मिळालेली नाही. ज्या तरुणाने धमकीचा मेसेज पाठवला तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.