मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीन आठवड्यापासून मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका संपावर आहेत. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना ६५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जी आमची मागणी आहे, त्याप्रमाणे मानधनवाढीवर अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी ठाम आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपाल शिवसेनेने पाठिंबा दिलाय. याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांचे म्हणणे कानावर घातले.


चर्चेतील ठळकबाबी 


 - राज्य मंत्रीमंडळ बैठकी पूर्वी शिवसेना मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची शिवसेना मंत्र्यांची मागणी
- इतर राज्यात १० हजारच्या घरात मानधन मिळते
- इतर राज्यात जेवढे मानधन मिळते तेवढे मिळावे
- दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे


रेल्वेचे प्रश्न सोडविण्यावर भर


- महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबतही चर्चा झाली
- त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन
- एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिज दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
- रेल्वेचे सगळे ब्रिज दुरुस्त झाले पाहिजेत
- रेल्वे पुलावरील सर्व फेरीवाले हटविण्याची मागणी केली
- मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्याचे आश्वासन
- ही समिती पुलांबाबत निर्णय घेईल
- पोलिसांच्या संगनमताने फेरीवाले बसतात