Jobs without Degree: या नोकऱ्यांसाठी पदवीची गरज नाही, कमाई होईल जबरदस्त
Jobs without Degree: चांगली नोकरी करुन मोठी कमाई करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि त्यासाठी मोठ्या शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात.
मुंबई : Jobs without Degree: चांगली नोकरी करुन मोठी कमाई करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि त्यासाठी मोठ्या शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात. प्रवेश घेतल्यानंतरही अनेकांना शिक्षण पूर्ण करता येत नाही किंवा शिक्षण पूर्ण करुनही त्यांना नोकरीसाठी इकडे-तिकडे भटकंती करावी लागते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करु शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरजही भासणार नाही.
कमर्शियल पायलटसाठी पदवीची गरज नाही
व्यावसायिक (commercial) पायलट होण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही आणि पायलट होण्यासाठी डिप्लोमा घेऊन तुम्ही व्यावसायिक पायलट होऊ शकता. मात्र, यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून तुम्हाला पायलटचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. कमर्शिअल पायलट झाल्यानंतर तुम्ही दरमहा 5 ते 6 लाख रुपये कमवू शकता.
1 लाख रुपयांपर्यंत वेब डेव्हलपर्स कमाई करु शकतो
सध्या सर्व काही ऑनलाइन होत असून प्रत्येकाला वेबसाइट बनवायची आहे. अशा परिस्थितीत वेब डेव्हलपर्सची मागणी वाढत आहे. वेब डेव्हलपर होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज भासणार नाही. मात्र, यासाठी वेबसाइट आणि इंटरनेटचे ज्ञान असले पाहिजे. तुम्ही कोणत्याही संस्थेतून वेब डेव्हलपर कोर्स करुन मोठी कमाई करु शकता. चांगल्या आणि अनुभवी वेब डेव्हलपरचा पगार 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
तुम्ही कॅसिनो व्यवस्थापक बनून लाखो कमवू शकता
भारतामध्ये कॅसिनो मॅनेजरची मागणी कमी आहे, परंतु परदेशात त्याला खूप मागणी आहे आणि कॅसिनो मॅनेजरचे वार्षिक उत्पन्न 32 हजार ते 58 हजार डॉलर्स म्हणजेच 25 लाख ते 41 लाख रुपयांपर्यंत असू शकते. कॅसिनो व्यवस्थापक होण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, परंतु यासाठी तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आणि कॅसिनोमध्ये खेळल्या जाणार्या खेळांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया तज्ज्ञ व्हा
सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे आणि मोठ्या कंपन्यांनी त्यांचे सोशल मीडिया हाताळण्यासाठी सोशल मीडिया तज्ज्ञांची नियुक्ती सुरु केली आहे. सोशल मीडिया तज्ज्ञ होण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, परंतु तुम्हाला इंटरनेट आणि मार्केटचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. सोशल मीडिया एक्सपर्ट दरमहा 60 हजार रुपये कमवू शकतो.
रिअल इस्टेट ब्रोकर बनून तुम्ही लाखो कमवा
रिअल इस्टेट ब्रोकर होण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. यासाठी स्थावर मालमत्तेचे ज्ञान आणि आपल्याला काही गोष्टी लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. रिअल इस्टेट ब्रोकरची कमाई निश्चित नसते आणि त्यात डील करुन तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.