मुंबई : कोरोना संकटाच्या काळात स्मगलर नवनवे पर्याय शोधत आहेत. दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या 2 नागरिकांना पकडलं आहे. शॅम्पूमध्ये हिरोइन नेताना पकडलं असून तपासणीत याबाबतची माहिती मिळाली आहे. या हिरोइनची किंमत तब्बल 136 करोड रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हिरोइनची तस्करी शॅम्पू आणि केसांना लावल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या बॉटलमधून लपून केली जात होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावर यांना अटक करण्यात आली आहे. या काळात हा सगळ्यात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपींना शुक्रवारी दुबईवरून पकडण्यात आले. 


पुढे तपासणीत 19.48 किलोग्रॅमचं काळ्या रंगाचा पदार्थ शॅम्पू आणि इतर रंगाच्या बॉटलमध्ये सापडलं. इतर सापडलेल्या पदार्थांची तपासणी करण्यात आली. याकरता ड्रग डिटेक्शन किटची मदत घेण्यात आली. यामध्ये सर्वात पहिली माहिती हिरोइन असल्याची माहिती मिळाली. 


सापडलेल्या साठ्यात 136.36 करोड रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीनंतर हा साठा हिरोइन असल्याची माहिती मिळाली. हिरोइन घेऊन प्रवास करणाऱ्या व्यक्तींना अट करण्यात आली आहे. 


तस्करीकरता नवनव्या पद्धतींचा अवलंब 


हल्ली स्मगलिंगमध्ये वाढ झाली आहे. तस्करी करण्याकरता स्मगलर कोणत्याही स्तराला जात आहेत. कस्टमच्या अधिकाऱ्यांना चकमा देण्यासाठी कोणत्याही स्तरावर जात आहे. अगदी फेस मास्क, टीव्ही, इमर्जन्सी लाइट आणि पास्ता तयार करणारी मशीनमधून ड्रग्सची तस्करी करण्यात येत आहे.