हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेंकडे नेतृत्व, देवेंद्र फडवणीस यांनी एका दगडात मारले अनेक पक्षी
एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व देण्यामागची दहा कारणं
Maharashtra Shinde Government : हारकर जीतनेवाले को देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) कहते है. देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेली ही बाजीगरी महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारी आहे. महाराष्ट्र मुलखात हा चमत्कार घडवू शकले ते फडणवीसच. राज्याच्या या सत्तासंघर्षात महाराष्ट्रानं ज्याचा स्वप्नातही विचार केला नसेल असा जबरदस्त मास्टरस्ट्रोक फडणवीस यांनी मारला.
या नव्या आणि धक्कादायक खेळीमुळे फडणवीसांनी एका दगडात किती पक्षी मारले, चला मोजूया....
१. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत आश्चर्याचा धक्का दिला
२. भाजपनं बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं
३. आपण कसे सत्तापिपासू नाही, हे फडणवीसांनी दाखवून दिलं
४. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा २०२४ मध्ये लढून बहुमतानं निवडून येण्याचा प्लॅन आखला
५. मुख्यमंत्रिपद घेतलं नाही तरी भाजप सत्तेत मात्र सहभागी होणार
६. शिंदे मुख्यमंत्री झाले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच राहणार
७. मुख्यमंत्रिपदापासून दूर राहात आता महापालिका निवडणुकांसाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरणार
८. शिवसेनेच्या आडाख्या तडाख्यांना फडणवीसांनी पार धूळ चारली
९. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रमच हाती घेतला
१०. सत्तेचं ताट समोर असतानाही ते नाकारुन फडणवीस आणि भाजपची प्रतिमा उंचावली
मी पुन्हा येईनची राज्यात अडीच वर्षांत खिल्लीही उडवली गेली. आणि आज पुन्हा ते परत येतील अशी चर्चा रंगत असतानाच ते सिंहासन सोडून देणं हा जबरदस्त मास्टरस्ट्रोक फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलं 'समुद्र मे पानी उतरता देख, किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा'
हा समुद्र असा काही परतून आला की भल्याभल्यांच्या राजकीय शिडांना धक्का लागला. फडणवीसांची ही शिंदेशाही महाराष्ट्राच्या इतिहासात दिमाखानं लिहिली जाईल