Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी सरकारला विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे (BJP) पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. आघाडीची तब्बल 11 मतं फोडण्यात भाजपला यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडवला आहे. भाजपचे पाचही उमेदवार फडणवीस यांनी निवडून आणले आहेत. 


देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आलेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आम्ही 123 मतं घेतली होती, आता विधानपरिषद निवडणुकीत आम्ही 134 मतं घेतली आहेत 


आम्ही आधीपासून सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाहीए, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीए. आणि म्हणून आमच्या पाचव्या उमेदवाराला मतं देतील आणि तेच या ठिकाणी दिसून आलं. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


आणि एवढच नाही तर आमच्या उरलेल्या चार उमेदवारांनीही प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं घेतली आणि आमचा मोठा विजय झाला. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक इतक्या अडचणीतही या ठिकाणी आल्या आणि पुन्हा एकदा या विजयाला त्यांनी हातभार लावला आम्ही त्यांचे आभार मानतो. 


आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे भारताचा विकास करत आहेत, आज महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे. या विजयाने महाराष्ट्रात नविन परिवर्तनाची नांदी आपल्याला पाहिला मिळतेय. या सरकारच्या संदर्भातील असंतोष  आता बाहेर आलेला आहे. यापुढे आमचा संघर्ष असाच सुरु राहिल, आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.