देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची सुरक्षा राज्य सरकारने घटवली, भाजप आणि मनसेची टीका
फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे.
मुंबई : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे. नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जात असतो. संजय बनसोडे, अस्लम शेख अशा काही मंत्र्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याची सुरक्षा कमी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णयही बहुचर्चित ठरला होता. सरकारच्या निर्णयावर मनसेन टीका केली आहे. राज ठाकरेंना मनसे सुरक्षा व्यवस्था देईल अशी घोषणा मनसेनं केली आहे. सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.