मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना पेढा भरवायला हवा होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही दिलदारी त्यांनी दाखवायला पाहिजे होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पत्रकारपरिषद घेतली असती तर सगळ्यांचीच दिवाळी आनंदात गेली असती, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी 'झी २४ तास'च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वचन पाळायचं नसेल तर रामाचं नावही घेऊ नका'


यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून काहीच हालचाल झाली नाही. केवळ 'मीच पुन्हा, मीच पुन्हा', असा धोशा सुरु होता. पण तुम्हीच पुन्हा येण्यासाठी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा तर करायला पाहिजे होता, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


संजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका


यावेळी राऊत यांनी शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हवेच असल्याचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात ठरल्याप्रमाणे पहिल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. २०१९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री असं कुठे घटनेत लिहून ठेवलेले नाही, असे राऊत यांनी सांगितले.