Mumbai News: काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली होती. यामध्ये विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हीलचेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईला आलेल्या 80 वर्षीय व्यक्तीला विमान कंपनीकडून व्हीलचेअर न मिळाल्याने त्याला चालत जावे लागले आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) 80 वर्षीय एअर इंडिया (AI) प्रवाशाच्या मृत्यूबद्दल अहवाल मागवलाय. ज्याला मुंबईत उतरल्यानंतर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवाशाने वृद्ध पत्नीसह एअर इंडियाला व्हीलचेअरसाठी आधी विनंती केली होती. मात्र त्यावेळी जोडप्याला फक्त एकच देण्यात आली होती. टर्मिनलच्या आतील इमिग्रेशन काउंटरपर्यंत तो सुमारे 1.5 किलोमीटर ते चालत गेले. त्या ठिकाणी जाताच ही व्यक्ती कोसळली. त्यांना विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला मृत घोषित करण्यात आलं.


NHRC ने DGCA ला नोटीस बजावून चार आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.  ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईची द्यावी. त्याचप्रमाणे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासंदर्भात खात्रीपूर्वक पावलं उचलावीत. 


NHRC ला आढळून आलं की, हवाई प्रवासी आणि विमान भाडे देखील लक्षणीयरीत्या वाढलंय. मात्र त्यामानाने सुविधांचा दर्जा त्या प्रमाणात सुधारला नाही. परिणामी मीडिया आणि सोशल मीडियामध्ये याबाबत असंख्य तक्रारी येत आहेत.


12 फेब्रुवारी रोजी घडली घटना


12 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानतळावर ही घटना घडल्याचं समोर आलं. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितलं की, तो प्रवासी 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होता. या वृद्ध दाम्पत्याला एकच व्हीलचेअर देण्यात आली होती. वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. "व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला व्हीलचेअरची मदत मिळेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. पण वृद्ध प्रवाशाने सोबत पायी चालणे पसंत केले. ही दुर्दैवी घटना असून आम्ही शोकग्रस्त कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे आणि आवश्यक ती मदत करत आहोत," असे एअर इंडियाने म्हटलं.