मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा लोकनेता म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे होय. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव या लोकप्रिय चित्रपटांनंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आता दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनपट मोठा पडद्यावर आणणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांनी शिवसेनेचा मोठा प्रचार आणि प्रसार केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिघे यांनी संघटन मजबूत केले. समाजसेवेचं मोठं कार्य हाती घेतलं. ठाणे मुंबई, दक्षिण नाशिक, उत्तर रायगड परिसरात कार्यकर्ते तयार केले. मराठी मनावर त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली. लोकहित तसेच धर्मासाठी काम करणाऱ्या दिघे यांना लोक धर्मवीर संबोधू लागले.


दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव देखील धर्मवीर असेच आहे. या चित्रपटाचे लेखन स्वतः प्रवीण तरडे करणार आहेत. त्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. 



तरडे यांनी सोशलमीडियावर पोस्टर शेअर केल्या केल्या ते मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले. अनेकांनी आनंद दिघे यांच्या आठवणी जागवल्या. तर अनेक कार्यकर्त्यांचे डोळे दिघे यांच्या चित्रपटाचे पोस्टर पाहून पाणवलं. ते भाऊक झाले.


या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबाबत सध्यातरी कोणतही माहिती मिळालेली नाही. परंतू हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते आणि चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण ठाण्यातच होत आहे. 


या चित्रपटात समाजकारणासह राजकारणाचा तडका असेल हे मात्र नक्की.