राज्य शासनाच्या पुरस्कारांची घोषणा; धर्मेंद्र, हिराणी, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार
राज्य शासनाच्या राजकपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.
मुंबई : राज्य शासनाच्या राजकपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. धर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना राजकपूर तर विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णी यांना व्ही शांताराम पुरस्कार घोषित झालाय.
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र आणि प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राजकपूर पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. धर्मेंद्र यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. तर राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आलीय.