Sanjay Raut : भाजप-शिंदे गटावर (Shinde Group) घणाघात करण्याची एक संधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राऊत सोडत नाहीत. देशात 'द केरळ स्टोरीज'मुळे (The Keral Story) वातावरण तापलेलं असताना याच सिनेमाचा संदर्भ देत संजय राऊतांनी शिंदे-भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हीही लवकरच 'द डायरी ऑफ खोका सरकार' असा सिनेमा बनवतोय अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ही डायरी ती डायरी असे चित्रपट येत आहेत, मग खोका स्टोरीसुद्ध यायला हवी, दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी स्टोरी आयडीया देणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खोका स्टोरी मोठा ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटात माणसं कमी आणि खोके जास्त असतील असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 


फडणवीस यांचं प्रत्युत्तर
संजय राऊतांच्या या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आपल्या खास शैलीत अवघ्या तीन शब्दात समाचार घेतला. कोण संजय राऊत असा सवाल विचारत त्यांना उडवून लावलं. तर राऊतांच्या या विधानामुळे शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा (Deepak Kesarkar) मात्र चांगलाच संताप झाला.


संजय राऊत यांनी एकदा तरी सिद्ध करुन दाखवावं, आम्ही स्वत:ला विकलेलं नाही. ते विकायरला बसले असतील असा संताप केसरकरांनी व्यक्त केला. त्यांनी थोडीतरी लाज वाटली पाहिजे खोटं बोलायला, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही, यावर चर्चा झालीच पाहिजे, या लोकांची घरं बघा, त्यांच्या गाड्या बघा कुठून, त्यांचे व्यवसाय बघा? कुठून आलीत ही अलिशान घरं असा सवालही केसरकरांनी उपस्थित केलाय.


नितेश राणे यांचा टोला
दुसरीकडे संजय राऊत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर असलेल्या रागामुळे लवकरच 'डायरी ऑफ दिशा सालियन' सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) राऊतांना टोला लगावलाय. कोणत्या निर्मात्याशी बोलणं सुरु आहे, कोणते कलाकार नक्की झालेत, याची माहिती मी लकवकरच देईन असं नितेश राणे यांनी सांगितलं.


खोके आणि ओकेच्या घोषणेवरुन शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Sehwale) उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. आता राऊतांनी 'द डायरी ऑफ खोका सरकार बनवणार असल्याचा टोला लगावलाय.. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.