Viral Polkhol : तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर लॉटरी (Lottery) लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.  अनेकांना अचानक लाखो रुपयांची लॉटरी लागल्याचे मेसेज (Message) आलेयत. लॉटरी लागली असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, लॉटरी न काढताच लॉटरी कशी काय लागते. हा देखील प्रश्न आहे.  त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल मेसेज?
तुम्हाला 10 लाखांची लॉटरी लागलीय. लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी संपर्क साधा. खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मग तुम्हाला लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी माहिती मिळेल. असा मेसेज मोबाईलवर पाठवला जातो. त्यामुळे लॉटरीचे पैसे मिळणार म्हणून अनेकजण लिंक (Fake Link) उघडून आपली बँक डिटेल्स देतात. मात्र, खरंच पैसे मिळतात का?. लॉटरी न काढताच लॉटरी कशी काय लागते...? याची आम्ही पडताळणी केली... त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात...


व्हायरल पोलखोल 
लॉटरीचं आमिष दाखवून तुमच्याकडून पैसे घेतले जातात. लॉटरीचे पैसे ट्रान्सफर करण्याचं सांगून बँक डिटेल्स मागतात. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी टॅक्सचे पैसे मागतात. लॉटरी न काढता लॉटरी लागूच शकत नाही तुम्हाला पैशांचं आमिष दाखवून तुमच्याकडूनच पैसे उकळले जातात...तसंच बँक डिटेल्स घेऊन बँकेची माहिती घेतात. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.


भारतात ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये वाढ
भारत डिजिटलायझेशनच्या (Digitization) दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात बराच व्यवहार हा डिजिटल (Digital) स्वरुपात होऊ लागला आहे. पण त्याचबरोबर सायबर गुन्हांमध्येही मोठी वाढ झाली आहे. कधी लॉटरी लागल्याचं सांगत, तर कधी शॉपिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणं समोर आली आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये भारत जगात अव्वल असून जवळपास 68 टक्के घटना या केवळ एकट्या भारतात आहेत. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 


भारतात सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणं ही महाराष्ट्रात (Maharashtra) घडली आहेत. महाराष्ट्रात ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँक लोन फ्रॉड सारख्या बँकिंगशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. 


भारतानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये अमेरिकेत (America)  49 टक्के,  जपानमध्ये (Japan) 21 टक्के, जर्मनीत 30 टक्के, इंग्लंड (England) आणि फ्रान्समध्ये (Frans) 33 टक्के आणि न्युझीलंडमध्ये 38 टक्के इतके सायबर क्राईमचे प्रमाण आहे.