Maharashtra Assembly By-Election : कसबा (Kasba Peth) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad )  पोटनिवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीवरून (Maharashtra Assembly By-Election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)  मतभेद पहायला मिळत आहेत. ठाकरे गट (Thackeray Group) चिंचवडच्या जागेसाठी आग्रही आहे. तर, दोन्ही जागांवर लढण्यासाठी राष्ट्रवादी तयारी आहे. भाजप मात्र, ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे (maharashtra politics).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटनिवडणूक लढवण्यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चिंचवडची जागा लढवण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चिंचवडची जागा लढवण्यावर चर्चा करण्यात आली. तर, कसबा पेठची जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निर्णय घ्यावा असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटल आहे. 


चिंचवडमध्ये लढण्यास ठाकरे गटही इच्छुक आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे. त्यामुळे चिंचवडवरून शिवसेना राष्ट्रवादीतली रस्सीखेच उघड झाली आहे. पुण्याची कसबापेठची जागा काँग्रेस राष्ट्रवादी यांनी कोण लढणार हे ठरवावं असं राऊत यांनी म्हटले. एकीकडे कसबापेठसाठी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कसबा पेठसाठी समझौता होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आता शिवसेनेनं चिंचवडवर दावा केल्यामुळे मविआत पोटनिवडणुकीवरून वाद असल्याचं उघड झाला आहे. 


कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर, ज्यांनी अंधेरीची निवडणूक लढवणार म्हणून शिवसेनेचं चिन्ह गोठवलं त्यांना सल्ला देण्याचा अधिकार नाही असा टोला देखील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. 


चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचेही पाटील म्हणाले. तर दुसरीकडे भाजपचे अनके जण इच्छुक असले तरी उमेदवार कोअर कमिटी ठरवणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार की त्यांचे लहान भाऊ शंकर जगताप यांना याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे  आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारीला निधन झालं होतं. या दोन्ही आमदारांच्या जागेवर आता