मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल बाकी असताना राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागल्यात. येत्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हा फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे.  ५ ते १० जूनदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अर्थात या सर्व घडामोडी २३ मे च्या निकालावर बरचशा अवलंबून असणार आहेत. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे लोकसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार गिरीश बापट यांची दिल्लीवारी नक्की समजली जात असल्याने त्यांच्याकडे असलेली संसदीय कामकाज, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहकसंरक्षण ही खाती नव्या चेहऱ्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. 


राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस आहे. तेव्हा यांच्याकडे मंत्रिपद सोपवले जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. तसंच असे बदल हे शिवसेनेमध्ये होणार असल्याची जोरात चर्चा आहे.