चर्चेला सुरूवात, चर्चा योग्य दिशेने - उद्धव ठाकरे
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक संपली आहे. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली.
मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक संपली आहे. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली. दीडतासापासून काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. या चर्चेतून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, 'चर्चेला सुरूवात झाली आहे, चर्चा योग्य दिशेने जात आहे. तसेच चर्चा अंतिम टप्प्यात येईल, आणि जे काही अखेर ठरणार आहे, ते तुमच्यासमोरही येणार आहे'.