कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँका जर सहकार कायद्यांतर्गत रजिस्टर असतील तर त्यांना सहकार खात्याचा आदेश लागू होतो. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बॅकांनी तात्काळ शेतक-यांना 10 हजार रुपयाचं कर्ज उपलब्ध करुन द्यावं असं महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. 


सहकार खात्यानं 79 (अ ) नुसार राज्यातील बॅकांना आदेश दिले आहेत. त्यामुळं बॅकांनी राजकारण न करता शेतक-यांना तात्काळ पैसै उपलब्ध करुन द्यावेत असं आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडल आहे. सरकार नाबार्ड आणि राज्यसहकारी बँकेशी सुद्धा या प्रश्नांवर करत असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं आहे.