मुंबई : पावसाचं सावट संपून आता दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. दिवशी रविवार आल्याने एका बाजूला उत्साह तर नाराजी देखील होती. सणाच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्यामुळे मुंबईकरांना लोकलने प्रवास करणं कठीण होईल की काय? असा प्रश्न पडला होता. पण अखेर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी 27 ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक नसणार आहे. तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना अगदी आरामात प्रवास करता येणार आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेकजण नातेवाईकांना भेटायला जाणं पसंत करतात. अशावेळी मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलने प्रवास केल्यास सुखकर प्रवास होणार आहे. 


मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे. पण रविवारी आणि सोमवारी लोकल मात्र कमी धावणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोकलला गर्दी कमी असते. त्यामुळे रविवार 27 ऑक्टोबर आणि सोमवार 28 ऑक्टोबर रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


रविवारी 27 ऑक्टोबर रोजी अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन आहे. तर 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि दिपावली पाडवा आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसल्यामुळे शनिवार-रविवारी मध्यरात्री अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान ब्लॉक आहे. रात्री 12 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. यामुळे जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. 


दिवाळीच्या सुट्टीमुळे कमी लोकल धावणार असतील अधिक त्याच पद्धतीने कमी तिकिट खिडक्या देखील खुल्या असतील. मध्य रेल्वे मार्गावरील संगणकीय आरक्षण केंद्र बंद असणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते रात्री 10 या वेळत खिडक्या बंद राहतील. त्यामुळे या वेळी UTS ऍप आणि स्मार्ट कार्डचा वापर करावा.