दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात फटाके; Sensex सर्वोच्च स्तरावर
उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच....
बई : सोमवारी शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर सेंसेक्सनं उच्चांक गाठला. US presidential elections अमेरिकन निवडणूकीचा निकाल निश्चित झाल्यानं आशियातील बाजारात दमदार खरेदीचा माहोल दिसून आला.
भारतीय बाजारात गेल्या आठवड्यापासूनच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओढा पाहायला मिळत होता. तेच चित्र आणि अशीच तेजी सोमवारीसुद्धा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
सोमवारी निफ्टीचा उच्चांक १२४२४ वर पोहोचला. शुक्रवारी संध्याकाळी निफ्टी १२२६३वर असल्य़ाचं पाहाला मिळालं होतं.
दरम्यान सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून निफ्टीचाही नवा उच्चांक पाहायला मिळाल्यामुळं दिवाळीआधीच शेअर बाजारात फटाके फुटले असल्याचं वातावरण आहे.
मोठ्या शेअर्सची परिस्थीती.....
मोठ्या शेअर्सविषयी सांगावं तर, विप्रो, इंफोसिस, एचसीएल टेक, ब्रिटानिया आणि श्री सिमेंट या शेअर्सची सुरुवात तेजीनं झाली. तर, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एसबीआय आणि एसबीआय लाईफ हे शेअर मात्र लाल खुणेवर उघडले.