DMart CEO ने मुंबईत खरेदी केलं इतक्या कोटींचं घर, पाहा काय आहे प्रॉपर्टीची खास गोष्ट
Dmart च्या ग्राहकांना ही आगामी काळात मिळणार मोठी खुशखबर...
DMart CEO Navil Noronha : ऑक्टोबर 2021 मध्ये अब्जाधीश क्लबमध्ये सामील झालेल्या DMart CEO नेव्हिल नोरोन्हा यांनी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले आहे. त्यांनी एका रिअल इस्टेट प्रकल्पात 2 युनिट्स खरेदी केल्या आहेत आणि हे घर घेण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे घर घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेविल नोरोन्हा यांनी वांद्रे येथे 66 कोटी रुपयांना घर खरेदी केले असून 3.30 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. रुस्तमजी सीझनमध्ये (Rustomjee Seasons) त्यांनी या युनिट्सचे बुकिंग केले आहे.
ही प्रॉपर्टी डील रिअर इस्टेटमधील मोठ्या डीलपैकी एक आहे. हे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ आहे. Zapkey वरील नोंदणी दस्तऐवजानुसार, घराच्या आकाराचा विचार करता एकूण RERA कार्पेट क्षेत्रफळ 8,640 चौरस फूट आहे.
10 कारसाठी पार्किंगची जागा
या मालमत्तेची खास गोष्ट म्हणजे येथे 10 कारसाठी पार्किंगची जागा देण्यात आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, नेव्हिल नोरोन्हा अब्जाधीश सीईओंच्या क्लबमध्ये सामील झाले.
कंपनीच्या शेअरच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज शेअर 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 4,351 वर बंद झाला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात 2.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
5 वर्षांत शेअर्स 3,311 रुपयांनी वाढले
गेल्या 5 वर्षांचा विचार केल्यास, 22 सप्टेंबर 2017 रोजी कंपनीचा शेअर 1039 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये ३१८.७१ टक्के वाढ झाली असून या कालावधीत शेअर मूल्य ३,३११.८५ रुपयांनी वाढले आहे.
कंपनीची पुढील योजना काय आहे?
कंपनीचे सीईओ नेविल नोरोन्हा यांनी सांगितले की डीमार्ट आपल्या स्टोअरची संख्या 1,500 पर्यंत वाढवू शकते. भारतीय अब्जाधीश राधाकृष्ण दमानी यांचं DMart हे Avenue Supermarts Ltd अंतर्गत चालवली जाते. सध्या कंपनीच्या स्टोअर्सबद्दल बोलायचे झाले तर त्याची संख्या 284 आहे, ज्यामध्ये कंपनी पाच पट वाढ करण्याचा विचार करत आहे.