वाशी : जर तुम्ही कारप्रेमी असाल तर डीएनए ऑटो-शो 2017ला जरुरु भेट द्या. एकाहून एक सरस लक्झुरियस कारचं प्रदर्शन नवी मुंबईतल्या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरवण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑडी, बीएमडब्ल्यू, हुंदाई, दास्तून, निस्सान आणि मारुती या ब्रँडच्या कार या ऑटो-शोमध्ये ठेवण्यात आल्यात. कॅडिलॅक व्हिन्टेज कार आणि 1932 फोर्डचं मॉडेल या ऑटो शोचं विशेष आकर्षण ठरलंय. यामध्ये व्हीजेटीआय आणि के.जे. सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं ऑल टेरेन व्हेईकलही पहायला मिळणार आहे.


दरवर्षी, या ऑटो शोमध्ये नवीन कार ग्राहकांसाठी आणली जाते. आणि यावेळी मारुती स्विफ्ट डिझायर 2017 हे मॉडेल ग्राहकांचं लक्ष वेधून घेतेय. या ऑटो शोला सनम तेरी कसमचा अभिनेता हर्षवर्धन राणेनं खास उपस्थिती लावली.