मुंबई : घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुंबईतल्या ३० वर्षे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारतींचं सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात संबंधित इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.


या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसंच राज्य सरकार आणि महापालिका संयुक्तपणे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.


दरम्यान डिम्ड कनव्हेन्सचा विषयच आता निकाली निघणार आहे. इमारतीला ओसी नसेल तरी डिम्ड कनव्हेन्स मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिलीय.