दीपाली जगताप, मुंबई : सायन रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. आरक्षणाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचा हा एल्गार आहे. एमडी, एमएससाठी खुल्या प्रवर्गात प्रवेशाच्या जागा कमी असल्याने त्याला विरोध होत आहे. मराठा आरक्षण आणि सवंर्ण आरक्षण लागू झाल्यामुळे खुल्या प्रवर्गात जागा कमी झाल्यामुळे या डॉक्टरांनी आंदोलन सुरु झालं आहे. एमबीबीएस डॉक्टर झाल्यानंतर आरक्षणाची गरज काय असा सवाल आंदोलनकर्ते डॉक्टर विचारत आहेत. १५० ते २०० डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी काही डॉक्टर जर संपावर गेले तर रुग्णांचे हाल होऊ शकतात. प्रशासनाने त्यांच्यासोबत चर्चेची काही तयारी दर्शवली आहे की नाही य़ाबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.