Social Media : एका हिंदुस्थानी भाऊचा सोशल मीडियात मेसेज येतो आणि शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात. उभ्या महाराष्ट्रानं हे चित्र पाहिलं. त्यामुळे आता सोशल मीडियाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मुलं सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र ही मुलं कुणाला फॉलो करतात, कुणाच्या संपर्कात असतात, कशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतात याकडेही पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. 


हिंदुस्थानी भाऊचा चिथावणीखोर व्हिडिओ
हिंदुस्थानी भाऊ (Hindustan Bhau) नावाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे. हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हिडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलं आहे. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे.


थेरगाव क्वीनचा सोशल मीडियावर कहर
सोशल मीडियावर अशीच चर्चेत असलेली आणखी एक तरुणी म्हणजे थेरगाव क्वीन (Thergoan Queen).  या तरूणीनं इन्स्टाग्रामवर अक्षरश: कहर केला होता. अखेर आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली.  काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडची 'लेडी डॉन', 'थेरगाव क्विन' म्हणून ओळखली जाणारी तरूणी चर्चेत आहे. 


 या तरूणीला इंस्टाग्रामवर (Instagram) ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. साक्षीने मित्रांच्या मदतीने मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हीड्ओ तिने तयार केले आहेत. तिने शिवीगाळ करणारे, अश्लील भाषा असलेले अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिळाणाऱ्या लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हीडिओ तयार केल्याचे पोलीस चौकशीत मान्य केलं आहे.



यातून तरूणाई सोशल मीडियाच्या किती आहारी गेलीय हे स्पष्ट होतंय. खर तर सोशल मीडिया हे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे. त्याचा योग्य वापर केला तर समाजातले अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. मात्र तरूणाई सोशल मीडियात नको त्या लोकांचं अनुकरण करताना दिसतेय. 


त्यामुळे आता पालकांनीच याबाबत जागरूक राहायला हवं. या वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत. नाहीतर स्वयंघोषित भाऊ आणि स्वयंघोषित क्विन तरूणाईचं भवितव्य बिघडवल्याशिवाय राहणार नाही.