डोंबिवली: आता मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी आहे. डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. संतापजन म्हणजे या अल्पवयीन मुलीवर 29 जण बलात्कार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची मुलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रियकराने जानेवारी महिन्यात 14 वर्षांच्या पीडित मुलीवर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ काढला. 


या व्हिडीओवरून मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केला. तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू होते. सर्वांनी बदलापूर, रबाळे ,मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचं मुलीनं सांगितलं. या प्रकरणी  पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे. 


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत ट्विटरद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 'डोंबिवलीमध्ये घडलेली घटना अतिशय भयंकर आणि संतापजनक आहे. डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत.'