Uddhav Thackeray Interview : मला औरंगजेबाचे फॅन म्हणू शकत नाही.. लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते या शब्दांत औरंगजेबावरुन होणा-या टीकेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय.. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.. या मुलाखतीत आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेल्याने औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर आहात का? असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनीही हसत सुरुवात करत विरोधकांवर हल्लाबोल केला...


नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झाला आहात… असे ते म्हणतात. हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब का आठवतोय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात जाऊन त्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी खाल्ला होता, त्याची आठवण होतंय. बिनबुलाये मेहमान बनून पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारी लोपं मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब हा आग्य्रात होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठीच इकडे 27 वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही मला, पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्य्राला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे!


ते पुढे असंही म्हणाले की, पण त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य मराठय़ांनी गाजवलं, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत. शिवाय औरंगजेब वगैरे प्रचाराचे विषय असू शकतात का? 


यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही 10 वर्षे काय केलंत? पराभवाचं भूत समोर दिसायला लागल्यावर तुम्ही राम राम राम राम… करायला लागलात… म्हणजे निवडणुकीत राम… राम… राम… करायचं आणि निवडून आल्यावर लोक प्रश्न घेऊन आले की, मरा… मरा… मरा… मरा… करायचं. शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. शेतकरी मेला तरी चालेल… पाच वर्षांनंतर बघू. महिलांवर अत्याचार झाले तरी चालतील… पाच वर्षांनंतर बघू. तुम्हीच सांगितलं होतंत ना, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱयांना हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू… याच हमीभावासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावर बंदुका रोखता? त्यांच्यावर अश्रुधूर सोडता? त्या शेतकऱयांना तुम्ही दहशतवादी संबोधलंत. अर्बन नक्षल म्हणालात. शेतकरी जेव्हा दिल्लीला निघाले तेव्हा संघाचे कार्यवाह का काय म्हणतात ते दत्तात्रय होसबळे म्हणाले की, शेतकऱयांचे आंदोलन हे अराजक आहे. अशी सगळी ही माणसं आहेत!