मुंबई : शहरातील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य सरकारच्यावतीने उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला प्रेरणा देणार असेल. तसेच अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढण्यासाठी ते प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी अभिवादन करताना संदेश दिला. त्यावेळी त्यांनी सांगितले, इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची, जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल.


आंबेडकरांचे स्मारक हे सर्वसामान्यांचे सरकार पूर्णत्वाला नेईल. बाबासाहेबांनी दिलेल्या समता, न्याय आणि बंधुता या विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहिल. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी शासन प्रयत्नशील पाहिल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत.



दरम्यान, आज सकाळी महापरिनिर्वाण दिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना सकाळी चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आंबेडकर ज्या ठिकाणी राहायचे तेथे प्रत्यक्ष भेट दिली. आजवर या ठिकाणी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी बीआयटी चाळीची पाहणी केली नव्हती. येथील आंबडेकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


दादरच्या चैत्यभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंबेडकर यांना अभिवादन केले. ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयाची दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने दाखल झालेत.