मुंबई : 'ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह' प्रकरणात आता जर गाडी चालक दोषी आढळला तर त्याचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो. तसे आदेशच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत. परिवहन खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या शिवाय वाहनांमध्ये वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर विम्याशिवाय गाडी चालवत असल्याचं आढळल्यास तत्काळा गाडीच जप्त करण्याचे आदेशही परवहन मंत्र्यांनी दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबरला तुम्हाला एन्जॉय करायचंच असेल तर रात्री पार्टीत दारु प्यायल्यावर गाडी चालवून स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका... त्याऐवजी तुम्ही काही पर्याय वापरू शकता... 


१)३१ तारखेला रात्री स्वत:ची गाडी न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. उदा. बस, रिक्षा, टॅक्सी, ट्रेन


२) ड्रायव्हर भाड्याने घ्या... त्यासाठी आतापासूनच बुकिंग करा


३) तुम्ही पार्टीला जाणार असलेल्या आयोजकाकडे गाडीची व्यवस्था करण्याची मागणी करा


४) तुमच्या पालकांना किंवा इतर नातेवाईकांना पार्टीसाठी गेलेल्या ठिकाणाची माहिती देऊन ठेवा


५) तुमच्या ओळखीतील दारु न पिणाऱ्या व्यक्तीला सोबत ठेवा