मुंबई :  Nawab Malik vs BJP : ड्रग्ज प्रकरणावरुन ( Drugs Case) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातच्या द्वारकामध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. (Drug Connection Gujarat) हाच धागा पकडत राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलेच वातावरण तापले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणावरून ( Drugs Case) भाजपकडून आरोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यावरून निशाणा साधला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी यावरून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. हा सगळा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का, असा सवाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.


गुजरातमध्ये तब्बल 350 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज सापडल्यामुळे आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचे केंद्र बनू लागले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावरून नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचे देखील नाव घेतले आहे.


गुजरातमधील बंदर मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये गेलेत. तिथे स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. गुजरातच्या एका मंत्र्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सगळे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातहून चालत नाही ना, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.