मुंबई : Mumbai Drugs case: ड्रग्ज प्रकरणाचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून NCBच्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले गेले. हे जाळे थेट दाऊदपर्यंत पोहोचले होते. देशात नोटा जप्त केल्या गेल्यात. नोटबंदीत एक वर्षात राज्यात बनावट नोटांचे जाळे. देशात नोटा जप्त, मात्र, राज्यात कारवाई केली गेली नाही. बनावट नोटांचे प्रकरण दाबले गेले. बनावट नोटांचे जाळे दाऊदपर्यंत आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला. (Nawab Malik vs Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबीमध्ये कोट्यवधीची वसुली सुरू आहे. तो विषय मी समोर आणला त्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे काम सुरु आहे. कारण तो अधिकारी फडणवीस यांच्या जवळचा आहे, त्याला वाचवायचे आहे, असा आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.


आपण (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले. नागपूरचा मुन्ना यादव याच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते.  हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.


रियाज भाटी दाऊदचा माणूस


रियाज भाटी कोणाबरोबर फोटो काढतो ते महत्त्वाचे आहे. दोन बोगस पासपोर्टसह तो मुंबई विमानतळावर पकडला जातो आणि दोन दिवसात सुटतो. रियाज भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा पोहोचला? सार्वजनिक जीवनात कोणीही फोटो काढतो. माझा आरोप फोटोवर नाही. पण गुंडांना, अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना महामंडळाचे अध्यक्ष कसे केले गेले, हा आहे, असे मलिक म्हणालेत.


खोट्या नोटांचे रॅकेट कोण चालवतो?


- हाजी अरफात शेख ज्याला फडणवीस यांनी अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष केला होता. याचा हा छोटा भाऊ आहे जो खोट्या नोटांचे रॅकेट चालवतो
-त्याला तुम्ही मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले.


- रियाज भाटी कोण होता, ज्याला दोन पासपोर्टसह पकडला होता
- तो भाजपच्या कार्यक्रमात कसा असायचा
- पंतप्रधान या शहरात आले तेव्हा रियाज भाटी याने त्यांच्याबरोबर फोटो काढला
- पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात सगळे चौकशी करून प्रवेश दिला जातो इथे रियाज भाटीला प्रवेश कसा दिला जातो 
- रियाज भाटी अंडरवर्ल्डचा माणूस एअरपोर्टवर दोन पासपोर्ट पकडला जातो 
- तो फरार आहे, त्याला फडणवीसांनी आपल्या जवळ का ठेवले होते 
- फडणवीस यांनी सगळ्या क्रिमिनल लोकांना पदावर बसवले, खोट्या नोटांचे रॅकेट चालवणार्‍यांना पदे दिली
- खोट्या नोटांचे प्रकरणाचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे, तेव्हा ते डीआरआयला होते.


14 कोटी 56 लाख रुपयांच्या खोट्या नोटा 


- 8 ऑक्टोबर 2017 रोजी रेडमध्ये 14 कोटी 56 लाख रुपयांच्या खोट्या नोटा बीकेसीत पकडल्या
- पाकिस्तान, आयएएस व्हाया बांगलादेश खोट्या नोटा देशात पाठवत होते
- याप्रकरणात मुंबईत एक अटक झाली
- पुण्यात, मुंबईत एक अटक झाली
- पण 14 कोटी 56 लाखाची जप्तीला 8 लाख 80 हजार दाखवून प्रकरण दाबले
- याप्रकरणात काही दिवसात जामीन दिला गेला
- प्रकरण एनआयएकडे दिलं जात नाही
- कारण खोट्या नोटांचे रॅकेट चालवणार्‍यांना सरकारचे संरक्षण होते
- काँग्रेसचा नेता असल्याचा बनाव केला, तो काँग्रेसचा नेता कधी नव्हता, काही झालं तरी काँग्रेसवर बिल फाडायचे


नवाब मलिक यांची पत्रकार परिषद


काल फडणवीस यांनी माझ्यावर काही आरोप लावले होते काल मी त्याचा खुलासा केला


मंत्री असताना सलीम पटेल याची माहीती नव्हती का? 2005 साली मी मंत्री नव्हतो
- मुनीरा यांच्याकडून जमीन घेतल्यानंतर सलीम पटेलचा आर आर पाटील यांच्याबरोबरचा. व्हिडोओ व्हायरल झाला होता
- सरदार वली तिथे वॉचमन असलेल्याचा मुलगा होता, तिथे 300 मीटर जागेवर त्याने आपले नाव चढवले होते त्याच्याशी मी व्यवहार केला होता


- 8 नोव्हेंबर २०१६ ला मोदींनी नोटबंदी केली
- तेव्हा खोट्या नोटा देशभर पकडल्या जाऊ लागल्या
- पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचा एकही प्रकार समोर आला नाही
- कारण फडणवीस यांच्या संरक्षणात खोट्या नोटांचा धंदा राज्यात सुरू होता


- एनसीबीमध्ये कोट्यवधीची वसुली सुरू आहे तो विषय मी समोर आणला त्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे आहे
- कारण तो अधिकारी फडणवीस यांच्या जवळचा आहे, त्याला वाचवायचे आहे


- आपण मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले
- नागपूरचा मुन्ना यादव यांच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते


- हैदर आझम ला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते
- तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो
- त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे
- याप्रकरणी मालाड पोलीस केस दाखल करत असताना तुम्ही पोलिसांवर दबाव आणून ते थांबवले
- फडणवीस यांच्या काळात जमीन मालकांना आणून सगळी जमीन नावावर करून घेतली जात होती
- परदेशातून गुंड फोन करत होते आणि पोलीस प्रकरण दाबत होते