मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case) पंच प्रभाकर साईल याने आरोप केल्यानंतर एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल चार तास चौकशी केली. समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती एनसीबीचे उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह (NCB Deputy DG Gyaneshwar Singh) यांनी दिली आहे. समीर वानखेडे यांनी या प्रकरणातील काही कागदपत्र सोपवल्याची माहितीही ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासावरुन समीर वानखेडे यांना हटवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ज्ञानेश्वर सिंह यांनी लावण्यात आलेल्या आरोपात जोपोर्यंत ठोस पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत समीर वानखेडे मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास अधिकारी म्हणून कायम असतील असं स्पष्ट केलं. एनसीबीची पाच सदस्यीय टीम सध्या मुंबईत आहे.


आज जवळपास चार तास समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. गरज पडल्यास वानखेडे यांच्याकडून आणखी काही कागपत्र आणि पुरावे मागितले जातील, असं स्पष्ट केलं. 


मुंबई ड्रग्स प्रकरणातील पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) आणि प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांना नोटीस पाठवण्यात यावी अशी विनंती दक्षिण-पश्चिम विभागीय कार्यालयाला केली. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही. आम्ही मीडियाच्या माध्यातून त्यांना आवाहन करु इच्छितो की त्यांनी तपासात सहभागी व्हावं आणि पुरावे द्यावेत, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. 


पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांच्या तपासासाठी एनसीबीच्या पाच सदस्यांची टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व प्रत्यक्ष साक्षीदारांना बोलावण्यात येईल. प्रभाकर साईल यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.