Lalit Patil Arrest:  ड्रग्ज तस्कर ललित पाटील  याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. साकिनाका पोलिसांच्या टिमने मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान ललित पाटील याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. यावेळी त्याने माध्यमांच्या कॅमेरासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ललीत पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण गेले. 


ललीत पाटीलला अंधेरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येत आहे. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरासमोर ललीत पाटीलने हा गौप्यस्फोट केला आहे.


ललीत पाटीलला या प्रवासात त्याला कोणी मदत केली, टुरीस्ट गाडी कोणी करुन दिली,  त्याच्यासोबत कोण होते? या सर्वांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.  ललीत पाटील हा आरोपी असून तो काहीही आरोप करु शकतो. असे असले तरी त्याने केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्रात खळबळ पसरु शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान ललीत पाटीलला वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना मी पत्रकारांशी बोलेन, असे ललित पाटील मीडियाच्या कॅमेरासमोर बोलताना दिसला. 


ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पोहोचला. धुळ्यानंतर छत्रपती संभाजीनंतर त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये जाऊन तीन दिवस राहिला.मुंबई पोलिसांची एकूण पाच पथक त्याच्या मागावर होती. गुजरातमधून ललित पाटील समृद्धी महामार्ग पकडून सोलापुरात आला आणि त्यानंतर त्याने कर्नाटकात प्रवेश केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अखेर ललित पाटीलला अटक करण्यात आलीय.ललित पाटील बेंगलूरूमधून परदेशात पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली.