मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कल्याणहून मुंबईकडे जाणारी जलद वाहतूक विस्कळीत
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली - ठाकुर्लीदरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद वाहतूकीवर परिणाम झाला आहे. डोंबिवली - ठाकुर्लीदरम्यान पाटणा एक्सप्रेसचं इंजिन बिघडल्याने खोळंबा झाला आहे. लोकलच्या एका मागोमाग रांगा लागल्या आहेत. जलद वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.