मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. तर दुसरीकेडे भारतात कोरोनाची दुसरी  लाट येण्याचे संकेत देखील प्रशाकनाकडून देण्यात आले आहेत. याचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसत आहे. सध्या देशात ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला जात आहे. तर ९ ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही राज्यांमध्ये सुरूवात झाली आहे. अशात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे परीक्षाही उशिरा होणार असल्याचं जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्या म्हणाल्या की, कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता १० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून २५ टक्के अभ्यास क्रम कमी करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहे, तर केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्णय राज्य सरकारवर सोपवले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.