महागाईचा सर्वसामांन्याना दणका, टोमॅटोचे दर 70 रुपये ते 100 रुपयांच्या घरात
महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी. 30-40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने भाव खाल्लाय.
मुंबई : महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी. 30-40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने भाव खाल्लाय. बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर 70 रुपये ते 100 रुपयांच्या घरांत गेलेत. दररोजच्या वापरातील टोमॅटोचे दर भडकल्याने गृहणीचं बजेट कोलमडलं आहे. (due to heavy shortage of of tomatoes in Maharashtra prices range from Rs 70 to 100 per kg)
अचानक दर वाढण्याचं कारण काय?
शेतकऱ्यांना क्वचित प्रसंगीच शेतमालाला अपेक्षित भाव मिळतो. इतर वेळी शेतकऱ्यांना कवडीमोळ दरातच आपला माल विकावा लागतो. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटो उत्पादन कमी घेतलं. परिणामी राज्यात टोमॅटोची कमतरता दिसून येतेय.
टॉमेटोचा दररोज भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. आवक घटल्याने टोमेटॉची मागणी वाढली. आवक कमी आणि मागणी वाढल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झालीये. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच आगामी काही दिवसात टोमॅटोची आवक न वाढल्यास सर्वसामांन्याना आणखी चढ्या दराने टोमॅटो खरेदी करावा लागू शकतो.