प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खोट्या पुतण्याने दिला 9 लाख रुपये नोकरी देण्याच्या नावाने वसूल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नकली पुतण्याने  विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांना फसवणूक अखेर पोबारा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणाला विद्युत विभागात नोकरी लावून देतो. माझे काका ऊर्जा मंत्री आहेत असे सांगत विश्वास संपादन केला आणि तरुणांकडून लाखो रुपये उकळले आणि तो पसार झाला. 


आपण फसवले गेलो असे लक्षात येताच  त्या तरुणांनी मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, यात संदीप राऊत या भामट्याचा शोध पोलीस घेत आहेत.


आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नातेवाईक असल्याचं सांगत या तरुणाने लोकांची फसवणूक केली आहे. आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने ११ जणांकडून सुमारे 9 लाख रुपये  घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


दादर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे. आरोपीचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.